भारत-बांगलादेशमध्ये आजपासून वनडे मालिका 1st ODI: India Vs Bangladesh in Mirpur

भारत-बांगलादेशमध्ये आजपासून वनडे मालिका

भारत-बांगलादेशमध्ये आजपासून वनडे मालिका

www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर

भारत आणि बांगलादेशमध्ये आजपासून वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होतेय. या मालिकेत तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. या दरम्यान टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सुरेश रैनाकडे असणार आहे.

बांगलादेश विरोधातील ही तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका, पुढील वर्षी होणाऱ्या विश्व चषकासाठी नव्या खेळाडूंना आजमवण्यासाठी चांगली संधी असल्याचं सुरेश रैनानं म्हटलं आहे.

आम्ही या मालिकेला इतर गंभीरतेने घेतलं आहे. इंग्लंड दौराही येतोय, त्यामुळे आम्ही काही खेळाडूंना आराम दिल्याचं कर्णधार सुरेश रैनाने म्हटलं आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 15, 2014, 12:37


comments powered by Disqus