Last Updated: Thursday, August 29, 2013, 13:09
www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन यानं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. या वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा असलेल्या अमेरिकन ओपनच्या मुख्य फेरीत सोमदेवनं पात्रता फेरीतून प्रवेश केला होता. सोमदेवनं स्लोवाकियाच्या लुकास लैको याचा पराभव केला.
सोमदेवनं पहिला सेट गमाविल्यानंतर पुढील दोन्ही सेटमध्ये चांगलेच पुनरागमन करत दोन्ही सेट 6-1, 6-2 असे सहज जिंकले. पण, चौथा सेट गमवावा लागल्याने सामना पाचव्या सेटपर्यंत लांबला. पाचव्या सेटमध्ये 4-4 अशी बरोबरी असताना सोमदेवनं लैकौची सर्व्हिस ब्रेक करत गुण मिळविला आणि आपल्याकडील सर्व्हिस कायम ठेवत विजयी गुण मिळविला.
सुमारे तीन तास 11 मिनिटं चाललेल्या सामन्यात सोमदेवनं स्लोवाकियाच्या लुकास लैको याचा 4-6, 6-1, 6-2, 4-6, 6-4 असा पाच सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या सेटनंतर पावसामुळं या सामन्यात व्यत्यय आला आणि सामना पुन्हा चार तासांनंतर सुरू झाला. सोमदेवचा दुसऱ्या फेरीत इंटलीच्या आंद्रेस सेप्पी याच्याशी सामना होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 13:09