Last Updated: Saturday, June 14, 2014, 07:38
www.24taas.com, झी मीडिया, साओ पावलोगतविजेत्या स्पेनचा दारुण पराभव झालाय. नेदरलॅडने ५-१ ने स्पेनचा दणदणीत पराभव केलाय. 2010 फुटबॉल वर्ल्डकप फायनलमध्ये स्पेननं नेदरलँडचा पराभव केला होता. याच पराभवाची परतफेड नेदरलँडने दणदणीत विजयाने केली.
नेदरलँड्सनं वर्ल्ड चॅम्पियन स्पॅनिश टीमला आपल्या सलामीच्या लढतीतच पराभवाचा धक्का दिला. ऑरेंज आर्मीच्या टोटल फुटबॉलनं स्पॅनिश आर्माडाच्या टीकी टाका स्टाईलचा अक्षरक्ष: खुर्दा पाडला.
या मॅचमध्ये ऱॉबिन वॅन पर्सीच्या नेदरलँड्सच्या टीमनं एक, दोन, तीन नव्हे तर एकामागून एक असे पाच गोल करत कॅसियसच्या टीमला पहिल्याच लढतीत पराभवाची चव चाखायला लावली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 14, 2014, 07:38