Last Updated: Wednesday, March 19, 2014, 22:32
www.24taas.com, झी मीडिया, मीरपूरटी-२० विश्व चषकाच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताने इंग्लड विरूद्ध प्रथम फलंदाजी करताना १७८ धावांचा डोंगर रचला आहे. तुफान फलंदाजी करताना विराट कोहली याने ७४ तर सुरेश रैना यांनी ५४ धावांची खेळी केली.
इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लडने सुरूवातीला भारताला ३ धक्के दिले. सहा षटकात भारताचे ३९ धावांवर ३ गडी बाद झाले. रोहित शर्मा ५, शिखर धवन १४ आणि युवराज सिंग हा अवघ्या १ धावावर बाद झाला.
सुरूवातीच्या तीन धक्क्यांनंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी ८१ धावांची भागीदारी केली. पंधराव्या षटकात सुरेश रैना झटपट रन्स काढण्याचा नादात झेलबाद झाला. त्यावेळी भारताची स्थिती ४ बाद १२० अशी होती. त्यानंतर कर्णधार धोनी आणि विराटने भारताची धावसंख्या १७८ पर्यंत पोहचवली.
विराट कोहलीने ४८ चेंडूत ८ चौकारांसह ७४ धावा केल्या. सुरेश रैना याने ३१ चेंडूत सहा चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनी याने १ चौकार आणि १ षटकारसह २१ धावा केल्या.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 19, 2014, 20:55