डेव्हिस कप : दुय्यम टीम निवडण्याची `आयटा`वर नामुष्की!, AITA selects depleted team for Davis Cup

डेव्हिस कप : दुय्यम टीम निवडण्याची `आयटा`वर नामुष्की!

डेव्हिस कप : दुय्यम टीम निवडण्याची `आयटा`वर नामुष्की!
www.24taas.com, नवी दिल्ली

टेनिसपटू आणि भारतीय टेनिस फेडरेशन यांच्यातील मानधनाचा वाद चांगलाच चिघळला आहे. डेव्हिस कपमध्ये सहभागी होण्यापासून महेश भूपती, रोहन बोपन्ना, सोमदेव देवबर्मन आणि विष्णुवर्धन यांनी स्वत:ला दूर ठेवणंच पसंत केलंय. लिएंडर पेस हा एकमेव टेनिसपटू भारताच्या टेनिस टीममध्ये सहभागी झालाय.

अखिल भारतीय टेनिस संघाला (एआयटीए) दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस कप सामन्यांसाठी मिळतील त्या खेळाडूंना सहभागी करणं भाग पडलंय. कारण, भारताच्या तब्बल आठ खेळाडूंनी आपण या सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याचं या टेनिसपटूंनी सांगितलंय.

१ ते ३ फेब्रुवारीदरम्यान दक्षिण कोरियाविरुद्ध भारतीय टेनिस टीमची मॅच रंगणार आहे. या सामन्यांमध्ये खेळण्याचा विचार करण्यासाठी खेळाडूंना आजपर्यंतची अवधी दिली गेली होती. पण नाराज खेळाडू मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे एआयटीएच्या निवड समितीनं एक बैठक घेऊन टीम निवडलीय ज्यामध्ये लिएंडर पेस हा एकमेव सिनिअर खेळाडू आहे. व्ही. ए. रणजीत, विजयंत मलिक आणि पुरव राजा यांची डेव्हिस कपच्या टीममध्ये वर्णी लागली आहे. जीशान अली यांच्याकडे टीमच्या कोचची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

First Published: Friday, January 11, 2013, 16:50


comments powered by Disqus