Last Updated: Tuesday, March 26, 2013, 21:03
www.24taas.com, मुंबईमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी 28 वर्षांहून अधिक काळ केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार एमओए चे अध्यक्ष होते. शरद पवारांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यांनतर त्या पदावर अजित पवारांची निवड झाली आहे.
एम ओ ए च्या कार्यकारिणीची निवडणूक आज पुण्यात झाली. अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सरचिटणीस, सह सरचिटणीस तसेच खजीनदारांची निवडही बिनविरोध झाली आहे. कार्यकारी सभासदत्वाच्या ८ जागांसाठी साठी १३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यांची निवडणूक आज झाली.
एमओए ची नवनियुक्त कार्यकारिणी अशी-
अजित पवार -अध्यक्ष
अशोक पंडित, प्रल्हाद सावंत, जय कोहली, प्रदीप गंधे - उपाध्यक्ष
बाळासाहेब लांडगे-सरचिटणीस
प्रकाश तुळपुळे , महेश लोहार - सह सरचिटणीस
धनंजय भोसले- खजीनदार
मोहन भावसार, प्रशांत देशपांडे, सुंदर अय्यर, प्रताप जाधव, रवींद्र कांबळे, एम एफ लोखंडवाला, किशोर वैद्य , मोहम्मद वाली - कार्यकारिणी सभासद
First Published: Tuesday, March 26, 2013, 20:25