ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: सायना सेमीफायनलमध्ये, all india championship : saina nehwal in semi final

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: सायना सेमीफायनलमध्ये

ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप: सायना सेमीफायनलमध्ये
www.24taas.com, लंडन

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय.

शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या क्वार्टरफायनलमध्ये सायनानं चीनच्या शिझियान वांगचा २३-२१, १९-२१, २१-१६ असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. बॅडमिंटनच्या कोर्टवर सायना विरुद्ध चायना असा संघर्ष नेहमीच पाहयला मिळतो. या लढतीत काल सायनानं बाजी मारली. सायनानं ऑल इंग्लंड स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये दुसऱ्यांदा धडक मारलीय. यापूर्वी २०१० मध्ये तिनं फायनल फोरमध्ये प्रवेश केला होता. जर्मनीच्य ज्युलियन शेंक आणि थायलंडच्या रातचानोक इंतानोन यांच्यामध्ये होणाऱ्या लढतीतील विजेत्याबरोबर सायनाला सेमीफायनलमध्ये झुंज द्यावी लागणार आहे.

परंतू, पुरुष एकल वर्गातील क्वार्टर फायनलमध्ये शुक्रवारी पारुपल्ली कश्यम याला मात्र मात मिळालीय. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय. त्यामुळे संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय ते सायनाच्या कामगिरीवर...

First Published: Saturday, March 9, 2013, 10:30


comments powered by Disqus