पुण्याचा अमोल बराटे हिंदकेसरी, Amol Barate Winner Of Hind Kesari Kusti Competation

पुण्याचा अमोल बराटे हिंदकेसरी

पुण्याचा अमोल बराटे हिंदकेसरी
www.24taas.com, झी मीडिया, पुणे

पुण्याचा मल्ल अमोल बराटे याने हिंदकेसरी किताब पटकावला आहे. अमोलने वायूदलाचा मल्ल सोनू याला चीतपट करुन हरियाणाचं मैदान मारले.

अमोलने आज सकाळी उपांत्य फेरीत मनजित सिंगचा सहज पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक दिली. त्यानंतर अमोलने वायूदलाच्या सोनू याला ६ - २ अशा फरकाने मात करत हिंदकेसरीवर आपले नाव कोरले.

रविवारपासून सुरु असलेल्या या स्पर्धेत खुल्या गटात ४० मल्ल सहभागी झाले होते. अखेरचा सामना तीन तीन मिनिटांच्या दोन फेऱ्यात पार पडला. या सामन्यात अमोलने सोनूवर मिळवलेली पकड कायम राखली आणि त्याला चीतपट केले.

अमोलने काल उपांत्यपूर्व फेरी जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचं या सामन्याकडे लक्ष लागलं होते. अमोल बराटे हा पुण्यातील वारजे येथील सह्याद्री क्रीडा संकुलात कुस्तीचा सराव करतो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, October 22, 2013, 17:19


comments powered by Disqus