विश्वनाथन आनंद दबावामुळे हरला - कार्लसन , Anand cracked under pressure: Carlsen

विश्वनाथन आनंद दबावामुळे हरला - कार्लसन

विश्वनाथन आनंद दबावामुळे हरला - कार्लसन
www.24taas.com, वृत्तसंस्था, चेन्नई

भारताचा विश्वनाथन आनंद बुद्धीबळ विश्व चॅम्पियनशिप हा दबावामुळे हरला, असी प्रतिक्रिया नविन विश्व चॅम्पियन्स मॅगनस कार्लसन यांने दिली. आनंद खेळताना दबावमध्ये होता. कार्लसनने दहाव्या खेळीत बाजी मारली. त्यांने आपला सामना ड्रा ठेवण्यास आनंदला भाग पाडले आणि बुद्धीबळच्या विश्व चॅम्पियनशिपचा किताब पटकावला. त्यांने पाचवेळा हा किताब जिंकला आहे.

पाच वेळा विश्वविजेता राहिलेल्या विश्वनाथन आनंदची ६४ घरांची सत्ता कार्लसन संपुष्टात आली. विशीपेक्षा वयानं निम्मा असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसननं चेन्नईत झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये आनंदला पराभूत करत वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरलं.

पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावलेला विश्वनाथन आनंद दबावाखाली पराभूत झाल्याचं मत वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने व्यक्त केलय. विश्वनाथनच्या चुकांची जबाबदारी मला घ्यायला आवडेल. वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दबावाखाली खेळ बिघडू शकतो हे यापूर्वीही आपण पाहिल आहे. विश्वनाथनने अशा काही चूका केल्या की ज्या चूका तो करु शकला नसता. खरतर आनंदला प्रदीर्घकाळ खेळण्यास मजबूर कराव अशीच आपली इच्छा होती अस कार्लसनने विजयानंतर सांगितल.

१०व्या सामन्यात कार्लसनला केवळ अर्ध्या गुणाची आवश्यकता होती. हा सामना दोघांनी बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतल्यावर कार्लसनच्या विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब झालं. पराभवानं निराश झालेल्या आनंदनं आपल्याकडून या स्पर्धेत काही चुका झाल्या, त्याची किंमत मोजावी लागल्याचं मान्य केलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 17:28


comments powered by Disqus