एचडी कॅमेऱ्यावर पाहा `ब्राझुका`चे दण दणा दण गोल!, At least the Brazuca soccer ball is ready for the

एचडी कॅमेऱ्यावर पाहा `ब्राझुका`चे दण दणा दण गोल!

एचडी कॅमेऱ्यावर पाहा `ब्राझुका`चे दण दणा दण गोल!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

फुटबॉल वर्ल्ड कपचा उत्साह शिगेला पोहचलाय. या वर्ल्ड कपसाठी वापरण्यात येणारा बॉल कसा असेल? याबाबतही फुटबॉलप्रेमींना उत्सुकता आहे.

ब्राझील... फुटबॉलची पंढरी... फुटबॉलच्या याच मक्केत रंगणार आहे 2014 चा फुटबॉल वर्ल्ड कप... या वर्ल्ड कपसाठी ‘ब्राझुका बॉल’ वापरण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या सियालकोटमधून तब्बल 42 मिलियन ‘स्कॉर बॉल्स’ ब्राझीलमध्ये निर्यात करण्यात आले. दक्षिण आफ्रिकेत 2010 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये वापरण्यात आलेल्या ‘जाबुलानी बॉल’वर जोरदार टीका झाली होती. मात्र, या चुका सुधारुन ब्राझुकामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

‘ब्राझुका’ हे नाव ठेवण्यासाठी जगभरातील एक मिलियन फुटबॉल फॅन्सनी मतदान केलं. 10 देशातील 30 टीम्समधील 600 फुटबॉलपटूंनी या बॉलची चाचणी केली. या बॉलचं वजन 437 ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे या बॉलमध्ये सहा एचडी कॅमेरे लावण्यात आले आहेत. जे कॅमेरे 360 डिग्रीपर्यंत अॅक्शन कॅच करु शकणार आहेत.

ब्राझुका या नावात ब्राझीलच्या संस्कृतीचं आणि नृत्याची झलक आहे. त्यामुळेच 2014 च्या या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये ब्राझुकाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. अव्वल फुटबॉलपटूंनीही या बॉलला हिरवा कंदील दिलाय. त्यामुळेच याच ‘ब्राझुका बॉल’नं वर्ल्ड कपमध्ये दण दणा दण गोल होणार यात शंकाच नाही.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 6, 2014, 10:15


comments powered by Disqus