Last Updated: Wednesday, May 7, 2014, 20:54
www.24taas.com, झी मीडिया, रिओ डी जानेरो ब्राझीलमध्ये फूटबॉल विश्वचषकाचे तापमान वाढत असातानाच, संयोजकांनी ब्राझीलमध्ये दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी विविध सूचना दिल्या आहेत. एकत्र राहा, अनोळखी व्यक्तींकडून काहीही स्वीकारू नका, झोपडपट्टीत जाऊ नका आणि डासविरोधी मलम विसरू नका अशा अनेक सूचना संयोजकांनी दिल्या आहेत. ब्राझीलच्या शहारांमध्ये गुन्ह्य़ांचे प्रमाण २३.६ टक्क्यांनी वाढले आहे. याच कारणाने या सूचना ब्राझील सरकारने दिल्या आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी झोपडपट्टी भगात मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाला होता. अमली पदार्थ विकणाऱ्यांवर आणि गुन्हेगारांच्या टोळ्यांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय. अगदी मागच्याच आठवड्यात रोचिना नावाच्या झोपडपट्टीत हिंसाचार झाला. रिओ शहराचा काही भाग जंगलासारखा आहे. त्यामुळे चाहत्यांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे. हल्ला,बंदी करणे आणि बलात्कारासारख्या घटना केव्हाही घडू शकतात. त्याच प्रमाणे किंमती वस्तू लुटण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
फूटबॉल विश्वचषकासाठी अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, अर्जेटिनातील दाखल होणाऱ्या चाहत्यांसाठी ब्राझीलने खास सूचना जाहिर केली आहे. संपूर्ण वर्ल्डकप दरम्यान पाच ते दहा लाख परदेशी नागरीक ब्राझीलमध्ये येतील. या कारणाने पोलिस सुरक्षा ही आताच वाढवण्यात आली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 7, 2014, 20:54