Last Updated: Tuesday, November 13, 2012, 16:55
www.24taas.com, लंडन महेश भूपती आणि रोहन बोपन्ना यांची जोडी आणखी एक इतिहास कायम करण्यात थोडक्यात चुकली. त्यांनी एटीपी विश्व टूर फायनलच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या मार्शेल ग्रानोलेर्स आणि मार्क लोपेज यांनी मात दिली.
टूर्नामेंटमध्ये पहिल्यांदाच एकत्र खेळणारी पाचव्या क्रमांकावर असलेली भारतीय जोडी असलेल्या भूपती-बोपन्नाला फायनल सामन्यात ५-७, ६-३, ३-१० अशा फरकानं पराजयाला सामोरं जावं लागलं. तर सहाव्या क्रमांकावर असलेल्या स्पॅनिश जोडीनं दीड तास हा सामना खेळवत आपल्या पदरात पाडून घेतला.
आत्तापर्यंत भारताच्या एकाही जोडीला सत्रातील हा अंतिम सामना जिंकता आलेला नाही. लिएंडर पेस आणि महेश भूपती तीन वेळ एकत्र खेळत फायनलमध्ये पोहचले होते. भूपती पाचव्यांदा या स्पर्धेचा उपविजेता ठरलाय.
First Published: Tuesday, November 13, 2012, 16:52