Last Updated: Tuesday, December 4, 2012, 13:21
www.24taas.com, कोलकाता खेळासाठी परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या बऱ्याचदा वेगवेगळे अनुभव येतात. दुसऱ्या देशांतील राहण्याच्या, खाण्याच्या पद्धती निराळ्याच... त्या पद्धतींशी जुळवून घेताना या खेळाडुंच्या नाकी नऊ येतात. असेच काही अनुभव नुकतेच ऐकायला मिळाले...
नुकतंच, क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार यांच्या ‘कुकिंग ऑन द रन’बद्दल सुरु असलेल्या चर्चेत अनेक खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी इथं उपस्थित असलेल्या वीरेंद्र सेहवागनं आपल्याला बिर्याणी आणि उत्तर भारतीय जेवण पसंत असल्याचं म्हटलंय. पण त्याचवेळी, दौऱ्यावर असताना मात्र आपल्या आवडीनिवडी बाजुला ठेवून दिवस वेज बर्गरवरच काढावा लागतो, अशी खंतही व्यक्त केली. परदेशात भारतीय पद्धतीचं जेवण मिळणारे रेस्टॉरन्ट शोधण फारच कठिण असतं... हाच अनुभव भारतीय टेनिसपटू महेश भूपतीलाही आलाय.
परदेश दौऱ्यावर असताना तुम्हाला भारतीय पद्धतीचं जेवण मिळणं, यापेक्षा कोणतीही मोठी गोष्ट असू शकतं नाही, असं भूपती म्हणतो. आपलं म्हणणं स्पष्ट करताना भूपतीनं चीनच्या दौऱ्यावरची एक गंमतही उपस्थितांशी शेअर केली. ‘डेव्हिस कप स्पर्धेमध्ये चीनच्या दौऱ्यावर असताना एका रेस्टारन्टमध्ये माझ्यासमोर चक्क एक जिवंत साप ठेवला गेला आणि वर विचारलंही गेलं की हा तुम्हाला जेवणाला चालेल का?’ तेव्हा मात्र भूपतीला खरोखरच भारतीय जेवणाची उणीव प्रकर्षानं भासली. ती वेळ त्यानं कसंबसं दुसऱ्या पदार्थांवर मारून नेली. मात्र भूपतीला आता ही खात्री आहे की भारतापेक्षा चीनमध्ये चांगलं जेवण मिळूच शकत नाही. तर, भारतीय स्पीनर आर. अश्विनचा अनुभव सांगतो की, विदेशात शाकाहारी जेवण मिळणं कठिणच...
First Published: Tuesday, December 4, 2012, 13:21