Last Updated: Sunday, August 19, 2012, 21:19
www.24taas.com, हैद्राबाद हैद्राबादमध्ये सचिनच्या हस्ते सायना नेहवालचा सत्कार करण्यात आला. तसंच सायनाला बीएमडब्ल्यू कारही भेट देण्यात आली.
सायनाने ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकल्यानंतर सचिनने सायनाची भेट घेणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार सचिनने आज सायनाची भेट घेतली.
सायनाच्या ऑलिम्पिकमधील मेडलमुळे देशातल्या अनेक युवकांना बॅडमिंटनसारख्या क्रीडा प्रकारात रूची निर्माण होईल असं सचिन यावेळी म्हणाला. सचिनच्या हस्ते सायनाला बीएमडब्लू भेट देण्यात आली. सचिनच्या हस्ते सायनाचा आगळावेगळा सत्कार करण्यात आला.
First Published: Sunday, August 19, 2012, 21:18