बोल्ट सुसाट... २०० मीटरमध्येही जिंकलं सुवर्ण पदक!, Bolt won Gold Medal the 200m in the World Championship

बोल्ट सुसाट... २०० मीटरमध्येही जिंकलं सुवर्ण पदक!

बोल्ट सुसाट... २०० मीटरमध्येही जिंकलं सुवर्ण पदक!
www.24taas.com , झी मीडिया, मॉस्को

जमैकाचा स्टार उसेन बोल्टनं शनिवारी आयएएएफ विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा सुसाट कामगिरी केलीय. २०० मीटर स्पर्धेत त्यानं सुवर्ण पदक पटकावलंय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बोल्टचं हे सातवं सुवर्ण पदक आहे.

२६ वर्षीय बोल्टनं १९.६६ सेकंदानं पहिलं स्थान पटकावलं. स्वेदशीय अॅथलेटिक वारेन वेयरनं १९.७९ सेकंदात २०० मीटर अंतर पार करत द्वितीय म्हणजे रजत पदक जिंकलं. तर अमेरिकेचा कर्टिन मिशेलनं २०.०४ सेकंदात हे अंतर पार करत कांस्य पदक जिंकलं.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतलं बोल्टनं पटकावलेलं हे सातवं सुवर्ण पदक आहे. त्यानं बर्लिनला २००९मध्ये १०० आणि २०० मीटर स्पर्धेत, २०११ला दीगू इथं २०० मीटर आणि मागील आठवड्यात मॉस्को इथं १०० मीटरमध्ये सुवर्ण पदक आपल्या नावावर केलेत. याव्यतिरिक्त २००९ आणि २०११मध्ये बोल्ट जमैकाच्या चार वेळा १०० मीटर रिले टीमचा पण तो भाग होता. या टीमनंही सुवर्ण पदक जिंकलं होतं. याशिवाय बोल्टनं ओसाकामध्ये २००७ला विश्व चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर आणि चार वेळा १०० मीटर रिलेमध्ये दोन रजत पदक आपल्या नावं केलेत.

२००८ आणि २०१२मधील ऑलिम्पिक स्पर्धेतही बोल्टनं सुवर्ण पदक जिंकलं. सात सुवर्ण पदक जिंकलेल्या बोल्टसमोर अॅथलेटिक्समधून संन्यास घेतलेल्या अमेरिकेच्या कार्ल लुईस आणि मायकल जॉन्सनच्या जोडीच्या आठ सुवर्ण पदक जिंकण्याच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याची संधी आहे. कारण आता बोल्ट आज होणाऱ्या चार वेळा १०० मीटर रिलेमध्ये सहभागी होणार आहे.

बोल्ट पायवर सूज असतांनाही २०० मीटरमध्ये सहजपणे सुवर्ण पदक जिंकलं. आता सगळ्या अॅथलेटिक्स प्रेमींचं आणि बोल्टच्या फॅन्सचं लक्ष आहे आज होणाऱ्या रिलेकडे. बोल्ट या रेकॉर्डची बरोबरी करतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, August 18, 2013, 08:59


comments powered by Disqus