FIFA वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये अनोखा रेकॉर्डBrazil beat Croatia world cup opener a new record s

FIFA वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये अनोखा रेकॉर्ड

FIFA वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये अनोखा रेकॉर्ड
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

फिफा वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये एक अनोखा रेकॉर्ड बनलाय. या मॅचमध्ये जरी क्रोएशियाविरोधात ब्राझीलनं 3-1 अशी मॅच जिंकली. पण मॅचचे सर्व गोल ब्राझीलच्या खेळाडूंनीच केले. मॅचचा पहिला गोल क्रोएशियाच्या खात्यात गेला मात्र कोणतीही मेहनत न करता.

कारण क्रोएशियाला पहिला गोल हा ब्राझीलचा खेळाडू मार्सेलोच्या चुकीमुळं मिळाला. मार्सेलाचा पाय लागल्यानं बॉल ब्राझीलच्याच गोल पोस्टला गेला. ज्यामुळं वर्ल्डकपचा पहिला गोल क्रोएशियाच्या नावे झाला.

ब्राझीलच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं की कोणत्या खेळाडूनं स्वत: आपल्या टीमविरोधातच गोल केला. कालपासून सुरू झालेल्या फिफा वर्ल्डकपच्या पहिल्या मॅचमध्ये ब्राझीलनं विजय मिळवला. ब्राझीलनं क्रोएशियाला 3-1नं हरवलं. ब्राझीलकडून नेमारनं 2 आणि ऑस्करनं 1 गोल केला. या विजयानंतर ब्राझीलच्या खात्यात 3 गुण जमा झाले.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 13, 2014, 15:58


comments powered by Disqus