आर्मस्ट्राँगने केले मान्य्, `ड्रग्स घेत होतो`, confesses Armstrong on Oprah show

आर्मस्ट्राँगने केले मान्य्, `ड्रग्स घेत होतो`

आर्मस्ट्राँगने केले मान्य्, `ड्रग्स घेत होतो`
www.24taas.com, टेक्सास

आर्मस्ट्राँग म्हणतो की, खरं काय आहे ते फक्त मलाच माहित आहे, ही गोष्ट अनेक वर्षापासून सुरू आहे, मी कँन्सर सारख्या आजारातून बरा होऊन टूर दी फ्रान्स हा किताब पटकावला. मात्र हे सार काही खरं नाही. मी जे काही केलं आहे त्याची मला शरम आहे. जर मी ड्रग्स नसते घेतले तर मी जिंकूच शकलो नसतो.

२००५ मध्ये मी शेवटचं डोपिंग केलं होतं. आर्मस्ट्राँगने सांगितले की, ही गोष्ट मान्य करण्यास मला बराच कालावधी लागला. मी माझा निर्णय घेतला मात्र ती माझी चूक होती. मी आज ही मुलाखत देतो आहे कारण की त्या गोष्टीसाठी मी माफी मागू शकेल. ओपरा विनफ्रेला दिलेल्या खास मुलाखतीत त्याने ही गोष्ट स्पष्ट केली.

लान्स आर्मस्ट्राँगचं २००० सिडीनी ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं ब्राँझ मेडल आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनने परत घेतलं आहे. डोपिंगचं आरोप मान्य केल्यानंतर आर्मस्ट्राँगकडील मेडल काढून घेण्याचा निर्णय आयओसीने घेतला आहे.

१९९९ ते २००५ या दरम्यान आर्मस्ट्रॉँगनं सातवेळा टूर डी फ्रान्स जिंकण्याची किमया साधली होती. दरम्यान, १९९६ मध्ये त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. यानंतर कॅन्सरवर मात करत कमबॅकही केलं होतं. २४ जुलै २९९५ मध्ये त्याने टूर डी फ्रान्सला अलविदा केला होता. त्यानंतर १६ फेब्रुवारी २०११ मध्ये सायकल जगतालाही गुडबाय केला होता.

त्यानंतर २०१२ मध्ये अमेरिकन डोपिंग एजेन्सिने त्याच्यावर डोपिंगचे आरोप ठेवले आणि ते सिद्धही झाले. त्यातच डोपिंगच्या आरोपांची त्याने कबुली दिली आणि त्याला ऑलिम्पिकचे मेडल आयओसीला परत करणं भाग पडलं.

First Published: Friday, January 18, 2013, 12:25


comments powered by Disqus