चेंडू लागल्याने द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मृत्यू, Cricket Player Dies After Being Hit In Head

चेंडू लागल्याने द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा मृत्यू

चेंडू लागल्याने द. आफ्रिकेच्या क्रिकेटरचा  मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, जोहान्सबर्ग

प्रथम श्रेणी सामन्या दरम्यान दक्षिण आफ्रीकी क्रिकेटर डॅरेन रॅंडल या क्रिकेटपटूचा सामन्यादरम्यान डोक्यात चेंडू लागल्याने मृत्यू झाला आहे.

ओल्ड सेलबॉर्नियन्स आणि फोर्ट हारे विद्यापिठ या दरम्यान झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यात ३२ वर्षीय रँडल क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाजाने आखूड टप्प्याचा चेंडू मारल्याने तो रँडलच्या डोक्याला लागला. क्षणार्धात तो जागेवर कोसळला. त्यानंतर लगेचचं त्याला रुग्णालयात हलविण्यात आले पण रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दक्षिण अफ्रिका क्रिकेट मंडळाने याबाबत शोक व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडता कामा नये, यासाठी सर्व क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 28, 2013, 19:28


comments powered by Disqus