Last Updated: Monday, January 14, 2013, 14:13
www.24taas.com, मुंबईसुवर्ण महोत्सवी मुंबई-पुणे सायकल शर्यत मुंबईच्या ओंकार जाधवनं जिंकलीय. तर आंध्र प्रदेशचा जिताराम दुस-या क्रमांकावर राहिला.
रेल्वेच्या हरप्रीत सिंगला तिस-या क्रमांकावर समाधान मानावं लागलं.महत्वाचं म्हणजे ओंकार जाधव गेल्या वेळेस तिस-या क्रमांकावर होता...मात्र सुवर्ण महोत्सवी वर्षात विजेतेपद पटकावण्याची किमया त्यानं साधलीय.
मानाचा घाटाचा राजाचा किताब सांगलीच्या दिलीप मानेनं पटकावलाय. त्यामुळे यंदाच्या शर्यतीवर महाराष्ट्राचं वर्चस्व राहिलंय. तत्पूर्वी सकाळी मुंबईत गेट वेपाशी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात केली. स्पर्धेत १४१ सायकलपटू सहभागी झाले होते.
सुवर्ण महोत्सवी मुंबई-पुणे सायकल शर्यत मुंबईच्या गेट वेपासून झाली. पुण्यात संभाजी उद्यानासमोर ती संपली. यावर्षी ७ लाख ६५ हजारांची बक्षिसं विजेत्यांना देण्यात आली. १५३ किलोमीटरची ही स्पर्धा होती.
First Published: Monday, January 14, 2013, 14:13