दिएगो मॅरेडोना भारतात!, Diego Maradona arrives in India

दिएगो मॅरेडोना भारतात!

दिएगो मॅरेडोना भारतात!
www.24taas.com, कन्नूर

अर्जेंटीनाचा माजी स्टार फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना भारतात दाखल झालाय. दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेला मॅरेडोना प्रथम कोच्चीमध्ये दाखल झालाय.

दिएगो मॅरेडोना कोच्चीच्या नेदुमबासरी एअरपोर्टवर जेव्हा दाखल झाला तेव्हा फुटबॉलप्रेमींनी त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. त्याच्या सुरक्षेसाठी जवळपास दोन हजार पोलीस यावेळी तैनात होते. एका खाजगी कंपनीचा ब्रँड एम्बॅसेडर असलेला मॅरेडोना कंपनीच्या प्रचाराकरता भारत दौऱ्यावर आलाय. यानंतर तो कन्नूर इथल्या जवाहर लाल नेहरू स्टेडियममध्येही तरुण फुटबॉलपटूंना मार्गदर्शनदेखील करणार आहे. याआधी मॅरेडोना २००८ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी त्याने कोलकात्या शहराला भेट दिली होती.

First Published: Tuesday, October 23, 2012, 14:14


comments powered by Disqus