नॅशनल टूर्नामेंटची सक्ती नको - सायना, dont make compulsion for playing national tournament - saina n

नॅशनल टूर्नामेंटची सक्ती नको - सायना

नॅशनल टूर्नामेंटची सक्ती नको - सायना

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालसाठी २०१३ चा सीझन अतिशय खराब ठरला. या सीझनमध्ये त्याला एकही टुर्नामेंट जिंकता आली नाही. फिट नसल्यामुळे तिनं नॅशनल बॅडमिंटन टुर्नामेंटमधूनही माघार घेतली होती. सायनानं ‘खेळाडूंना नॅशनल टूर्नामेंट खेळणं सक्तीचं करू नये’ असं मत व्यक्त केलं आहे.

फिटनेसच्या समस्येनं सायनाला या सीझनमध्ये चांगलचं ग्रासलं होतं आणि याचाच परिणाम तिच्या खेळावरही दिसून आला. २०१२ मध्ये तिची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच झाली होती. मात्र, त्याची पुनरावृत्ती करण्यात सायनाला अपयश आलं. पूर्णपणे फिट नसल्यामुळे सायनानं नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधूनही आपलं नाव मागे घेतलं होतं. त्याचप्रमाणे २०१४ च्या सीझनच्या सुरुवातीच कोरिया ओपनही ती खेळणार नाही. फिटनेस राखण्यासाठी इंडियन बॅडमिंटन असोसिएशननं नॅशनल टुर्नामेंटमध्ये खेळणं सक्तीचं करू नये असं मतही तिनं व्यक्त केलंय.

सायनानं नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये माघार घेऊनही मेन ड्रॉमध्ये तिचं नाव होतं. युवा बॅडमिंटन प्लेअर्सचा कल वाढावा यासाठी स्टार प्लेअर्सनी नॅशनल टुर्नामेंट खेळाव्या या मतावर बीएआय ठाम आहे. याच दरम्यान, सायनानं फिटनेसवर अधिक भर देणार असल्याचही सांगितलं आहे.

एकीकडे सायनानं नॅशनल टुर्नामेंट खेळणं सक्तीचं करू नये असं म्हटलंय. तर दुसरीकडे ज्वाला गुट्टानं नॅशनल टुर्नामेंटमध्ये बॅडमिंटनपटूंना खेळणं सक्तीचं कराव अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता या परस्परविरोधी प्रतिक्रिय़ांमुळे भारतीय बॅडमिंटनमध्ये एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे असच म्हणाव लागणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 24, 2013, 19:32


comments powered by Disqus