Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:33
www.24taas.com , झी मीडिया, फ्रान्स विम्बल्डन चॅम्पियन फ्रान्सच्या मारियन बार्तोलीनं टेनिस करिअरला अलविदा केलाय. 28 वर्षीय बार्तोलीनं निवृत्ती घेतल्यानं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळं बार्तोलीनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
सिनसिनाची मास्टर्समध्ये बार्तोलीला दुसऱ्याच राऊंडमध्ये पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दोन आठवड्यानंतर अमेरिकन ओपन सुरु होणार होती आणि यासाठी विम्बल्डन विजेत्या बार्तोलीची दावेदारी मजबूत होती. मात्र, तिच्या या निवृत्तीनं फ्रान्समधील घरच्या चाहत्यांसह जगभरातील टेनिस शौकीनांना मोठाच धक्का बसला आहे.
गेल्या माहिन्यातच जर्मनीच्या सबिन लिसिकीचा दोन सरळ सेट्समध्ये पराभव करत बार्टोलीनं विम्बल्डनवर आपलं नाव कोरलंय, असा पराक्रम करणारी अमेली मॅरिस्मोनंतरची ती दुसरीच महिला फ्रेंच खेळाडू ठरली होती. १३ वर्षे टेनिस खेळणारी बार्टोली सध्या जागतीक क्रमवारीमध्ये ७ व्या क्रमांकावर होती. तिची १ कोटी १० लाख डॉलरची कमाई असून मागील अनेक दिवसांपासून ती दुखापतीनं त्रस्त होती.
पूर्ण आणि दक्षिण महिला एकेरी स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत पराभव झाल्यानंतर बार्तोलीनं प्रसारमाध्यमांना आपण निवृत्ती जाहीर करत असल्याचं सांगितलं. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये निवृत्त होण्यासाठी मला हीच योग्य वेळ वाटते, असं नमूद करत हा माझ्या टेनिस प्रवासाचा शेवट आहे. हा निर्णय घेताना मला फारच जड जात असलं तरी माझ्यासमोर दुसरा कोणताच पर्याय उरलेला नाही, असं ती म्हणाली. निवृत्तीचं निवेदन करताना बार्टोलीला दुख आवरता आलं नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 15, 2013, 15:33