यूएस ओपन: रॉजर फेडररला पराभवाचा धक्का! Federer crashes out to Robredo in US Open stunner

यूएस ओपन: रॉजर फेडररला पराभवाचा धक्का!

यूएस ओपन: रॉजर फेडररला पराभवाचा धक्का!
www.24taas.com , झी मीडिया, न्यूयॉर्क

यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररला पराभवाचा धक्का बसलाय. चौथ्या फेरीतच फेडररचं आव्हान संपुष्टात आलं. स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोनं फेडररचा पराभव केला.

स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोनं फेडररवर मात करत त्याला ७-६, ६-३, ६-४ अशा तीन सेट्समध्ये हरवलं.
या सामन्यात फेडरर जिंकला असता तर राफेल नदालसोबत क्वार्टरफायनलमधे त्याची लढत झाली असती. पण फेडररच्या पराभवामुळं आता ती शक्यताही मावळलीय.

या सामन्यात माझी कामगिरी खराब झाल्याचं, फेडररनं सांगितलं. त्यामुळं फेडररचे चाहतेही नाराज झाले आहेत.

यूएस ओपन स्पर्धेत दुसरं मानांकन देण्यात आलेला स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालनं मात्र क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केलाय. नदालनं चौथ्या फेरीत जर्मनीच्या फिलीप कोल्हश्रेबर याचा 6-7(4), 6-4, 6-3, 6-1 असा पराभव केला. चौथ्या फेरीत फेडररचा पराभव झाल्यानं नदालचा क्वार्टरफायनलमध्ये स्पेनच्याच टॉमी रोब्रेडो याच्याशी सामना होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.


पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, September 3, 2013, 09:40


comments powered by Disqus