फिफा वर्ल्डकप - स्पेनचा धक्कादायक पराभव, FIFA World Cup - Spain`s shocking loss,

फिफा वर्ल्डकप - स्पेनचा धक्कादायक पराभव, नेदरलँड्सची किमया

फिफा वर्ल्डकप - स्पेनचा धक्कादायक पराभव, नेदरलँड्सची किमया
www.224taas.com, वृत्तसंस्था, ब्राझील

फिफा वर्ल्ड कपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन स्पेनचा चिलीने धक्कादायक पराभव करत त्यांना पॅक अप करायला भाग पाडल. वर्ल्ड कपमधील हा पहिला मोठा अप सेट ठरला. चिलीने स्पेनला 2-0ने पराभूत करत स्पेनच स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आणलं.

वर्ल्ड चॅम्पियन्सला शोभेसा खेळ करण्यात स्पेनला अपयश आल. तर चिलीने पहिल्यापासूनच मॅचवर आपली पकड मजबूत ठेवली. 20व्या मिनिटालाच चिलीच्या एडुआर्डो वर्गासने गोल करत चिलीचं खात उघडल. तर 43व्या मिनिटाला चार्ल अरन्गुइजने गोल करत चिलीना 2-0ने आघाडी मिळवून दिली. या पराभवामुळे गेली सहा वर्ष फुटबॉलविश्वात अधिराज्य गाजवणा-या स्पेनचा पाडाव झाला. तर चिलीने प्री-क्वार्टरमध्ये धडक मारलीय. स्पेनच्या या पराभवाबरोबर गतविजेत्यांची वर्ल्ड कपच्या पहिल्याच राऊंडमध्ये पराभूत होण्याची परंपराही कायम राहीली.

क्रोएशियाची कोलंबियावर मात
ग्रुप `ए`मधील कोलंबिया आणि क्रोएशिया मॅचमध्ये क्रोएशियाने कोलंबियावर 4-0ने मात केलीय. दोन गोल करणारा बायर्न मुनिच हा क्रोएशियाच्या विजयाचा हिरो ठरला. दहव्या मिनिटाला एविका ऑलिकने क्रोएशियाला पहिला ब्रेक थ्रु मिळवून दिला. तर दुसरा गोल इवॅन पेरिसिकने झळकावला. बायर्नने 60 आणि 73 व्या मिनिटाला दोन सलग गोल करत क्रोएशियाला भक्कम आघाडी मिळवून दिली. 2002 नंतर वर्ल्ड कपमध्ये क्रोएशियाचा हा पहिलाच विजय ठरलाय.

नेदरलँड्सने दुस-या विजयाची नोंद
नेदरलँड्सने सलग दुस-या विजयाची नोंद केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेदरलँड्सने 3-2ने विजय मिळवलाय. वर्ल्ड कप विजेत्या स्पेनला पराभवाचा धक्का देणारी नेदरलँड्स टीम पराभूत होते की काय अशी परिस्थिती मॅच दरम्यान निर्माण झाली होती. दरम्यान अनुभवाच्या जोरावर नेदरलँड्नसे विजय खेचून आणला.

अर्जेन रोब्बेनेने 20व्या मिनिटाला पहिला गोल करत नेदरलँड्सचं खात उघडल. यानंतर लगेचच 21व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या टिम काहिलीने गोल करत बरोबरी साधली. यानंतर मिले जेदिनाकने 54व्या मिनिटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला 2-1ने आघाडी मिळवून दिली. नेदरलँड्सचा महत्त्वाचा प्लेअर रोबिन वॅन पर्सीने 58 व्या मिनिटाला गोल करत नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली तर 68व्या मिनिटाला मेम्फिस डीपे गोल करत 3-2ने विजयी आघाडी मिळवून दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014, 08:07


comments powered by Disqus