फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील थोडक्यात बातम्या, fifa worldcup : World Football News in Brief

फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील थोडक्यात बातम्या

फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील थोडक्यात बातम्या
www.24taas.com, झी मीडिया, ब्राझील

पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन टीम ब्राझीलला मेक्सिकोनं गोल शून्य बरोबरीत रोखलं. थियागो सिल्व्हाची ब्राझिलियन टीम मेक्सिकोचा डिफेन्सच भेदण्यात अपयशी ठरली.

मेक्सिकोच्या गोलकीपरनं सांबा टीमचे तीन गोल रोखले. आणि तोच या मॅचचा हिरो ठरला.26 व्या मिनिटाला दानी आल्वेसच्या क्रॉस पासवर नेमारनं गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र ओचोआनं नेमारचा बॉल एका हातनं रोखत ब्राझीलला आघाडी मिळण्यापासून रोखलं. 69 व्या मिनिटालाही बर्नाडच्या पासवर नेमार पुन्हा एकदा गोल कऱण्यासाठी पुढे सरसावला. मात्र, मेक्सिकोची अभेद्य भिंत अर्थात ओचोआनं नेमारचं वर्ल्ड कपमध्ये तिसरा गोल करण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं.

ओचोआच्या याच असामान्य कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताबही देण्यात आला. ब्राझिलियन टीमचा विजय पाहण्यासाठी स्टेडियमध्ये तब्बल 65 हजार चाहते उपस्थित होते. मात्र, त्यांना निराश होऊन परताव लागलं.

बेल्जियमनं अल्जेरियावर 2-1 ने मात
चित्तथरारक लढतीत डार्क हॉर्स बेल्जियमनं अल्जेरियावर 2-1 नं विजय मिळवत वर्ल्ड कपमध्ये परफेक्ट स्टार्ट केली. बेल्जियमकडून फलानी आणि मार्टेनेस या सबस्टिट्यूटसनी सेकंड हाफमध्ये गोल करत बेल्जियमला विजय मिळवून दिला.
सेंकड हाफमध्ये मार्क विल्मोटस यांनी बेल्जियमच्या खेळातील स्पेस वाढावा यासाठी मारोने फलानीला मैदानात उतरवलं.

फलानीनं आपल्या मॅनेजरचा विश्वास सार्थ ठरवला आणि हेडरवर गोल करत बेल्जियमला बरोबरी साधून दिली. हाच गोल मॅचला कलाटणी देणारा ठरला. त्यानंतर विल्मोटस यांनी मॅच संपायला काही मिनिटं शिल्लक असतांना आणखी एका सबस्टिट्यूटला मैदानात उतरवलं. तो म्हणजे ड्रीस मार्टेनेस... मार्टेनेसनही 80 व्या मिनिटाला गोल करत बेल्जियमचा विजय सुकर केला.

रशिया-दक्षिण कोरिया सामना बरोबरीत
अतिशय निरस झालेल्या फर्स्ट हाफनंतर रशियाननं कमबॅक करत दक्षिण कोरियाविरुद्धची मॅच 1-1 न बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.

दक्षिण कोरियाच्या क्यून हो लीनं 68 व्या मिनिटाला गोल करत आपल्या टीमला आघाडी मिळवून दिली. यानंतर 74 व्या मिनिटाला केरझाकोव्हानं गोल झळकावत रशियाला बरोबरी साधून दिली. रशियाला पराभवाचा धक्का सहन करावा लागेल अशी भिती वाटत होती. मात्र, अखेरच्या क्षणी गोल करत त्यांनी हा पराभव टाळला.

स्पेनचा दुबळ्या चिलीशी मुकाबला

डिफेंडिग चॅम्पियन्स स्पेनचा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये दुबळ्या चिलीशी मुकाबला होणार आहे. पहिल्याच मॅचममध्ये नेदरलँड्सकडून सपाटून मार खावा लागल्यानंतर स्पॅनिश टीमला टुर्नामेंटमध्ये कमबॅकचं आव्हान आहे. स्टार्सची मंदियाळी असलेल्या स्पॅनिश टीमला पहिल्या मॅचमध्ये मानहानिकार पराभव सहन करावा लागला होता. आता टॉप 16 मध्ये आपल्या प्रवेश निश्चित कऱण्यासाठी त्यांना चिलीला मोठ्या गोल फरकानं पराभूत करावच लागणार आहे. चिलीनं आपली पहिली मॅच जिंकली आहे. त्यामुळे स्पेनच्या टीमला कडवी टक्कर देण्यासा त्यांची टीम आतूर असणार आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 08:02


comments powered by Disqus