Last Updated: Friday, June 13, 2014, 07:59
www.24taas.com, वृत्तसंस्था, साओ पावलोफुटबॉल वर्ल्डकपमध्ये यजमान ब्राझीलने विजयी सलामी दिली. क्रोएशिआचा ३- १ ने पराभव केलाय. ब्राझीलचा नेमार विजयाचा शिल्पकार ठरलाय.
दुबळ्या क्रोएशियाचा ब्राझीलनं फुटबॉल वर्ल्ड कपच्या सलामीच्या 3-1 नं धुव्वा उडवला. गोल्डन बॉय नेमार ब्राझीलच्या विजयाचा हिरो ठरला. नेमारनं दोन दोल झळकावत ब्राझीलच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर युवा ऑस्करनही एक गोल करत सा-यांचच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
ब्राझीलच्या टीमनं या मॅचमध्ये चॅम्पिनसारखा खेळ केलाच नाही. त्यांच्या मार्सेलोनं अकराव्या मिनिटाला क्रोएशियाच्या गोलपोस्टमध्ये बॉल धाडला आणि क्रोएशियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 29 व्या मिनिटाला 22 यार्डावरून डाव्या पायानं जोरदार किक लगावत नेमारनं गोल करत सांबा टीमला मॅचमध्ये बरोबरी साधून दिली.
त्यानंतर 71 व्या मिनिटाला ब्राझीलला नशिबाची साथ मिळाली. आणि पेनल्टीवर ब्राझिलियन सुपरस्टार नेमारनं गोल करत आपल्या टीमला आघाडी मिळवून दिली. मॅच संपायला काही मिनिटं शिल्लक असतांना ऑस्करनं अप्रतिम गोल करत ब्राझीलच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 13, 2014, 07:59