फ्रेंच ओपन फायनल : नदाल विरुद्ध फेरर, french open final, nadal vs ferror

फ्रेंच ओपन फायनल : नदाल विरुद्ध फेरर

फ्रेंच ओपन फायनल : नदाल विरुद्ध फेरर
www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस

काळजाचा ठोका चुकवणाऱ्या सेमी फायनलमध्ये `क्ले किंग` राफेल नदालनं नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव करुन फायनलमध्ये प्रवेश केलाय.

साडेचार तासांच्या या रोमहर्षक लढतीत नदालनं ६-४, ३-६, ६-१, ६-७, ९-७ असा पाच सेटमध्ये विजय मिळवला. पहिला सेट नदालनं जिंकल्यानंतर जोकोव्हिचनं दुसरा सेट जिंकत त्याची परतफेड केली. नदालनं तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचचा फडशा पाडत आघाडी मिळवली. पण तरीही जोकोव्हिचनं जिद्द सोडली नव्हती. टायब्रेकपर्यंत गेलेला हा सेट जोकोव्हिचनं ६-७ असा जिंकला. पाचव्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सर्वांग सुंदर टेनीसचं प्रात्याक्षिक सादर केलं. या सेटमध्ये अनेक क्षण हे पुन्हा पुन्हा पहावे असे होते.

अखेर पंधराव्या गेममध्ये नदालनं आपली सर्व्हिस राखत आघाडी मिळवली. त्यापाठोपाठ सोळावा गेमही जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला. नदालनं या स्पर्धेत आठव्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता फायनलमध्ये त्याची लढत डेव्हिड फेररशी होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 8, 2013, 16:15


comments powered by Disqus