Last Updated: Sunday, June 9, 2013, 00:00
www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस फ्रेंच ओपनच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये अमेरिकेच्या अव्वल सीडेड सेरेना विल्यम्सनं रशियन ग्लॅम डॉल मारिया शारापोव्हावर मात केली.
सेरेनानं शारापोव्हाचा ६-४, ६-४ अशा सरळ दोन सेट्समध्ये धुव्वा उडवला. सेरेनाचं हे फ्रेंच ओपनचं दुसरं विजेतेपद ठरलं आहे. तर या विजयासह सेरेनानं टेनिस करिअरमधील १६ व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. डिफेंडिंग चॅम्पियन शारापोव्हाचं सेरेनाच्या धडाक्यासमोर काहीच चालल नाही. आणि तिला सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला.
वर्ल्ड नंबर वन सेरेना विल्यम्सची ही कामगिरी कौतुकास्पद अशीच म्हणावी लागणार आहे. फ्रेंच ओपनमध्ये सेरेनानं आपल्या कामगिरीनं साऱ्यांनाच पुन्हा एकदा थक्क केलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 9, 2013, 00:00