कार्लसनकडून विश्वनाथ आनंदला पराभवाचा धक्का ,Game 9: Carlsen defeats Anand again, extends lead to 6-3

कार्लसनकडून विश्वनाथ आनंदला पराभवाचा धक्का

कार्लसनकडून विश्वनाथ आनंदला पराभवाचा धक्का
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपमध्ये आनंदला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. नवव्या गेमध्ये त्याला कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

जागतिक अजिंक्यपदासाठी सुरू असलेल्या लढतीत मॅग्नस कार्लसनची आघाडी घेत विश्वनाथन आनंदला खिंडीत पकडले. दरम्यान, विश्वविजेतेपदात बरोबरी राखण्यासाठी आता विश्वनाथन आनंद याला उर्वरित तीन डावांपैकी तीनही डाव जिंकावे लागणार आहेत.

पाचवेळचा वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदच्या हातून २०१३ चॅम्पियनशिप गेल्यातच जमा आहे. कार्लसनच्या ध़डाक्यापुढे आनंदचं काहीच चालल नाही. त्याला कार्लसनचं आव्हान मोडित काढण्यात सपशेल अपयश आलं. कार्लसननं तीन पॉईंट्सची आघाडी घेतल्यानं आनंदला आता सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिपवर आपलं नाव कोरता येणार नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 21, 2013, 23:05


comments powered by Disqus