ग्रँडमास्टर विदित : महाराष्ट्राच्या `बुद्धीचं बळ` Grandmaster Vidit Gujarati

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या `बुद्धीचं बळ`

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या `बुद्धीचं बळ`
www.24taas.com, नागपूर

बुद्धिबळ क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर या सर्वोच्च किताबाला गवसणी घालण्याचा पराक्रम नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी यानं केलाय. अवघ्या अठराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर बनणारा विदित हा महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर असून तब्बल 13वर्षांनी महाराष्ट्राला त्याच्या रूपानं आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर लाभला आहे.

महाराष्ट्राचे पहिले ग्रॅँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्यानंतर 1999 मध्ये अभिजित कुंटे यांनी आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर किताब पटकावला होता. मात्र त्यानंतर महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर गवसला नव्हता. विदितच्या रूपानं एका तपाहून अधिक काळानंतर ग्रॅँडमास्टर गवसल्यानं महाराष्ट्रातील ग्रॅँडमास्टर्सची संख्या तीन झालीय. यापूर्वीचे दोन्ही ग्रॅँडमास्टर पंचविशीमध्ये झाले होते. त्यामुळे विदित हा महाराष्ट्राचा सगळ्यात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर ठरलाय.

नागपूरला सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ग्रॅँडमास्टर चेस कॉम्पिटिशनमध्ये नवव्या राउंडअखेर त्याला आवश्यक एक नॉर्म प्राप्त झाल्याने तो महाराष्ट्राचा तिसरा ग्रॅँडमास्टर बनला आहे.

First Published: Wednesday, October 24, 2012, 09:26


comments powered by Disqus