Last Updated: Friday, September 6, 2013, 20:21
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली नेमबाज अभिनव बिंद्रा यानं भारतीय ऑलिम्पिक संघातील डागाळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार अभियान सुरू केलंय. यामुळे नाराज झालेल्या आयओएचे अध्यक्ष अभय सिंह चौटाला यांनी अभिनववर व्यक्तीगत खालची पातळी गाठून टीका केलीय.
ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता आणि नेमबाज अभिनव बिंद्रा याचे वडील ए. एस. बिंद्रा यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अभिनवला निशाण्यावर धरलंय. सिनियर बिंद्रावर २००९ साली कथित वित्तीय अनियमिततेचा आरोप ठेऊन अटक करण्यात आली होती.
‘जर अभिनव बिंद्राला आरोपी लोकांकडून त्यांचं पद हिसकावून घेतलं जावं असं वाटत असेल तर त्यानं पहिल्यांदा त्याच्या वडिलांना घराच्या बाहेर काढावं किंवा स्वत:च त्यांचं घर सोडून द्यावं’ असं चौटाला यांनी एका न्यूज चॅनलशी बोलताना म्हटलंय.
चौटाला यांच्या या वक्तव्यामुळे या वादात आणखी ठिणगी पडलीय. भारतीय राष्ट्रीय रायफल संघाचे (एनआरएआय) अध्यक्ष रनिंदर सिंह यांनी यावर प्रतिक्रिया देताना चौटाला यांनी आपली वक्तव्य सुधारण्यावर भर द्यायला हवा, असं म्हटलंय.
‘हे तर उल्टा चोर कोतवाल को डांटे उक्तीप्रमाणे आहे. जे लोक काचेच्या घरात राहतात त्यांनी अशी वक्तव्य करू नयेत. मी बिंद्रा कुटुंबीयांना अतिशय जवळून जाणतो. अभिनवला आपलं म्हणणं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. एनआरएआयचा अध्यक्ष या नात्यानं मी चौटाला यांच्या वक्तव्याचा निषेध करतो’ अशा शब्दांत सिंह यांनी चौटाला यांच्या वक्तव्याची निंदा केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, September 6, 2013, 20:21