Last Updated: Monday, March 10, 2014, 12:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईजगातील सर्वात मोठी सायकल निर्माता कंपनी हिरो सायकल्सने देशातील लहान मुलांसाठी नव्या सायकल्सची रेंज लॉन्च केली आहे.
या सायकलींवर डिज्नी आणि मार्वल ब्रॅण्ड असेल. तीन ते १२ वर्षांच्या मुलांचा विचार करून या सायकल्स बनवण्यात आल्या आहेत.
या सायकलींवर मिकी माऊस आणि स्पायडर मॅन सारखी भरपूर चित्र लावण्यात आली आहेत.
डिज्नी इंडियाच्या कंझ्युमर प्रॉडक्टशी लायसन्स अॅग्रीमेंट केल्यानंतर हिरोने या नव्या १२ सायकलींचं मॉडेल लॉन्च केलं आहे.
या सायकलींची किंमत ३ हजार ३०० रूपयांपासून, ४ हजार ५०० रूपयांपर्यंत आहे.
डिज्नी आणि मार्वल सारख्या स्टोरीज आणि कॅरेक्टरची प्रेरणा देणाऱ्या या सायकली, १०० पेक्षा जास्त प्रिमियर डिस्ट्रीब्युटर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 10, 2014, 12:54