भारत-पाक हॉकी सीरिज रद्द..., india-pak hockey series cancelled

भारत-पाक हॉकी सीरिज रद्द...

भारत-पाक हॉकी सीरिज रद्द...
www.24taas.com, नवी दिल्ली

भारत आणि पाकिस्तान दरम्यान एप्रिलमध्ये भारतात खेळण्यात येणारी हॉकी सीरिज रद्द करण्यात आली आहे.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान दहशतवादी कारवायांमुळे जो तणाव निर्माण झालाय त्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र खात्याकडून ही सीरिज रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता ५ एप्रिलला भारतात दाखल होणारी पाकिस्तानी हॉकी टीम भारतीय दौऱ्यावर येणार नाही. तब्बल सहा वर्षांनंतर ही सीरिज आयोजित करण्यात आली होती, तीदेखील आता रद्द करण्यात आली आहे.

दरम्यान, भारतीय हॉकी टीमदेखील पाकिस्तानात सीरिज खेळण्यासाठी जाणार नसल्याचं परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. यापूर्वी हॉकी लीगमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झालेल्या पाकिस्तानी प्लेअर्सनादेखील दहशतवादी कारवायांमुळे पुन्हा पाकिस्तानमध्ये परतण्यास भाग पडलं होतं.

First Published: Friday, March 15, 2013, 15:29


comments powered by Disqus