भारत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत,India pip Malaysia 2—0 to enter final

भारत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

भारत आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत
www.24taas.com, झी मीडिया, इपोह

पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल मिळवत यजमान मलेशियाला रोखत सामन्यात २-० अशी आघाडी घेत भारताने आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

शुक्रवारी झालेल्या दुस-या उपांत्य लढतीत आठव्या मिनिटाला रघुनाथने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. व्ही. रघुनाथसह मनदीप सिंग पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावले. या दोघांनी स्पर्धेतील त्यांचा गोलांचा धडाका कायम ठेवला.

दुसरा गोल भारताला ६०व्या मिनिटाला मनदीप सिंगने करून दिला. भारताने ४५व्या मिनिटापर्यंत मलेशियाला एकही पेनल्टी कॉर्नर मिळू दिला नव्हता. त्यातच शेवटच्या मिनिटाला मलेशियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले होते मात्र पुन्हा भारताच्या बचावपटूंनी यजमानांना गोलचे खाते उघडू दिले नाही.

भारताची आता अंतिम फेरीत रविवारी १ सप्टेंबरला दक्षिण कोरियाशी गाठ पडणार आहे. भारताने याआधी गटवार साखळीत दक्षिण कोरियाला २-० असे नमवले आहे.

भारताने जर ही स्पर्धा जिंकली तर त्यांना पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरता येईल. मात्र पाकिस्तानचे आव्हान उपांत्य फेरीत संपल्याने भारताचा आणि मलेशियाचा वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ-अन्य खेळासह

First Published: Saturday, August 31, 2013, 13:04


comments powered by Disqus