रशिया ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमानIndians, but no Tricolour at the Sochi Olympics

रशियातील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमान

रशियातील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचा अपमान
www.24taas.com, वृत्तसंस्था, सोची, रशिया

बातमी रशियात सुरु झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकची. रशियाच्या सोची शहरात हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार शुभारंभ झाला. यंदाच्या या ऑलिम्पिकमध्ये एकूण तीन हजार एथलिट्स सहभागी झालेत.

भारताकडून शिवा केशवन, नदीम इकबाल आणि हिमांशु ठाकूर हे तिघेजण या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सामील झालेत. मात्र या ऑलिम्पिकच्या उदघाटन सोहळ्यातच भारताची मान शरमेनं झुकलीय. कारण या सोहळ्यात भारतीय एथलिट्सना देशाची शान असलेला तिरंगा अभिमानानं फडकवता आला नाही.

याला कारण ठरलंय ते आतंरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेनं भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर केलेली निलंबनाची कारवाई. त्यामुळं या ऑलिम्पिकच्या कोणत्याही खेळात सहभागी होण्याआधी भारताचा मोठा पराजय झालाय. कारण एखाद्या भारतीय एथलिटनं मेडल जिंकल्यात ते भारताचं होणार नाही. शिवाय भारताचे राष्ट्रगीत जन-गण-मन सुद्धा वाजवण्यात येणार नाही. त्याऐवजी ऑलिम्पिक धून वाजवली जाईल. या घटनेमुळं साऱ्या जगासमोर भारताचा मोठा अपमान झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 8, 2014, 09:45


comments powered by Disqus