भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम!, IOC rejects IOA`s clause, India`s Olympic ban to continue

भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम!

भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

भारताचा ऑलिम्पिकचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. आयओसीनं आयओएवर आपली बंदी कायम ठेवली आहे. आयओसी आपल्या अटींवर ठाम आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघानं आयओसीच्या अटी मान्य न केल्यामुळे भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2010 कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी दोषी असलेल्या ललित भानोत यांची आयओएचे महासचिव म्हणून निवड करण्यात आली. यानंतरच भारतावर 2012 डिसेंबरमध्ये आयओसीनं बंदीचा निर्णय घेतला. आयओसीनं भ्रष्टाचाराचे आरोप असणा-या अधिकारांना दूर ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र, भारतीय ऑलिम्पिक महासंघानं आयओसीची ही अट मान्य केली नाही. आणि आता त्यामुळेच भारतावर ऑलिम्पिक बंदी कायम राहणार आहे.

आयओएच्या हेकेखोरपणामुळे भारतीय खेळाडूंना आता चांगलाच फटका बसणार आहे. आयओएला निवडणुकांपूर्वी आयओसीच्या सर्व अटी मान्य करणं गरजेचं होतं. मात्र, आय़ओएनं तसं केलं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 5, 2013, 18:39


comments powered by Disqus