Last Updated: Saturday, March 30, 2013, 21:24
www.24taas.com, मुंबई आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्र गाजवल्यानंतर... भारतीय डबल्स बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा आता टॉलिवूडमध्ये पाय रोवण्यास सज्ज झाली आहे...
दक्षिण भारतीय `गुण्डे जारी गलानथिंडे` या चित्रपटात ज्वालाने साऊथ स्टार निथिन रेड्डीसह आयटम साँग केलं आहे... या आयटम साँगमध्ये २९ वर्षीय ज्वालाने निळ्या रंगाचं शॉर्ट ड्रेस परिधान केलं आहे... हे गाणं पुढील महिन्यात रिलीज होणार आहे...
ज्वाला गुट्टा तिच्या मादक अदांमुळे बरीच चर्चेत राहिली आहे. जाहिरात क्षेत्रातही ज्वालाने तिचा जलवा दाखवल्यानंतर आता सिनेमात देखील आयटम साँग मधून ती तिचा जलवा दाखवण्यास सज्ज झाली आहे.
First Published: Saturday, March 30, 2013, 21:24