कबड्डी आता `नेटवर`, यंगप्रभादेवी क्रीडामंडळाची वेबसाईट, Kabbadi krida mandal website

कबड्डी आता `नेटवर`, यंगप्रभादेवी क्रीडामंडळाची वेबसाईट

कबड्डी आता `नेटवर`, यंगप्रभादेवी क्रीडामंडळाची वेबसाईट
www.24taas.com, मुंबई

मुंबईच्या यंग प्रभादेवी क्रीडा मंडळातर्फे राजस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मुंबईत राहिलेली तुंटपुंजी खेळाची मैदाने आणि त्यातही अस्सल मातीतला खेळ कबड्डी ह्या दोन्ही गोष्टी नामशेष होत असताना या मंडळाने मॅटवरील राजस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करून या मराठमोळ्या खेळाला पुनरूज्जीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यांचा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.

त्यांच्या या प्रयत्नाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी देखील कौतुक केले आहे. त्याचसोबत या मंडळाने कबड्डीची महती पोहचवण्यासाठी वेबसाईट देखील सुरू केली आहे. http://youngprabhadevi.com/ ज्यात त्यांच्या मंडळाचा इतिहास, खेळांविषयी माहिती यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांच्या हस्ते काल या वेबसाईटचे अनावरण झाले.

तसेच मुंबईत रंगणारी राजस्तरीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ आले आहेत. जे आपला दम मुंबईत घुमवणार आहेत. अमर हिंद क्रीडा मंडळाने विजय क्लब संघाचा दणदणीत पराभव करीत उपांत्य फेरीत मजल मारली आहे. आज या स्पर्धेतील अंतिम सामने रंगणार आहेत.

First Published: Saturday, January 12, 2013, 17:05


comments powered by Disqus