Last Updated: Sunday, October 14, 2012, 11:30
www.24taas.com, वसईवसई-विरार महापौर मॅरेथॉनमध्ये आज स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. एल एम सिंगने यंदाच्या वसई-विरार मॅरोथॉनच्या जेतेपदाचा मान मिळवला. कविता राऊतने महिलांच्या हाफ मॅरेथॉनमध्ये बाजी मारली. तर सुधा सिंग यांच्यासारख्या टॉप अॅथलीट्ससह सुमारे साडे नऊ हजार धावपटू वसई-विरार मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले.
या स्पर्धेच्या हाफ मॅरेथॉनमध्ये आशिष सिंहने बाजी मारली.तर दुसऱ्या क्रमांकावर अर्जुन चौहानने नाव कोरलं. या मॅरेथॉनचं यंदाचं दुसरं वर्ष आहे. १६ वेगवेगळ्या गटांतून ही शर्यत होत असून बक्षीसाची एकूण रक्कम १८ लाख रुपये आहे.
यावेळी मिलिंद सोनम हा धावण्यासाठी पहिल्या रांगेत होता. त्याचबरोबर मराठी अभिनेतेही याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
First Published: Sunday, October 14, 2012, 11:20