खेलरत्नवरून नव्या वादाला सुरूवात, Khel Ratna controversy: Share award between Krishna Poonia and Ronjan Sodhi

खेलरत्नवरून नव्या वादाला सुरूवात

खेलरत्नवरून नव्या वादाला सुरूवात


www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शूटर रोंजन सोढीची शिफारस करण्यात आली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. डिस्कस थ्रोअर कृष्णा पूनियानं खेलरत्न मलाच हवा यासाठी हट्ट धरलाय. तर अपंग ऍशलिट गिराषानेही खेलरत्न नाही तर अर्जुन पुरस्कार तरी द्या अशी मागणी केली. मात्र, रोंजन आणि पूनियाच्या मेडल्सची तुलना केल्यानंतर आता क्रीडाप्रेमींनीच खेलरत्नसाठी कोण पात्र ते ठरवाव.

रोंजन सोढी.... वर्ल्ड नंबर वन डबल ट्रॅप शूटर... या सर्वोत्तम शूटरला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची शिफारस झाली त्यावेळी सर्वच स्तरातून त्याचं कौतुक करण्यात आलं. मात्र, भारताची डिस्कस थ्रोअर कृष्णा पुनियानं खेलरत्नसाठी मीच पात्र असल्याचं म्हणत नव्या वादाला सुरुवात केली.

वर्ल्ड डबल ट्रॅप रँकिंगमध्ये सोढीनं भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर डौलानं फडकवला. कृष्णा पूनियानही डिस्कस थ्रोमध्ये भारताला नवी ओळख मिळाली. दोन्ही खेळाडू आपापल्या क्षेत्रात अव्वल आहेत. ऑलिम्पिक, एशिया, कॉमनवेल्थ आणि वर्ल्ड कपमध्ये केलेल्या कामगिरीवर खेलरत्न पुरस्कारासाठी निकष आहे. ऑलिम्पिक मेडल मिळालेल्या क्रीडापटूला थेट खेलरत्न पुरस्कार देण्यात येतो.


2011 युएईमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये रोंजन सोढीनं गोल्ड मेडलची कमाई केली होती. त्यानंतर त्याचवर्षी स्लोव्हेनियामध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं ब्राँझ मेडल मिळवलं होतं. 2011 चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्येही सोढीनं सिल्व्हर मेडल मिळवून दिलं होतं. तर 2010 तुर्की वर्ल्ड कपमध्ये त्यानं पुन्हा एकदा सुवर्णवेध साधला होता. तर 2010 मध्ये चीनमधील एशियन गेम्समध्ये सोढीनं मेन्स डबल ट्रॅपमध्ये गोल्ड मेडलची कमाई केली. टीम प्रकारात त्यानं ब्राँझ मेडल मिळवलं होतं. 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये डबल ट्रॅप सिंगल्स प्रकरात त्यानं सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. तर डबल ट्रॅप पेअर्समध्ये त्यानं सिल्व्हर मेडलवर आपलं नाव कोरलं होतं.

2006 डोहा एशियन गेम्समध्ये भारताला डिस्कस थ्रोमध्ये ब्राँझ मेडल मिळवून दिलं होतं. तर 2010 ग्वांझाऊ एशियन गेम्समध्येही तिनं सिल्व्हर मेडल जिंकलं होतं. 2010 दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिनं भारताला गोल्ड मेडल मिळवून देत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली होती.


रोंजन सोढी आणि कृष्णा पूनिया यांनी आपापल्या क्षेत्रात भारताची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. मात्र, खेलरत्न या दोघांपैकी कोणाला मिळावा हे आता क्रीडाप्रेमींनीच ठरवाव

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 20:49


comments powered by Disqus