भूपती - नेस्टर चेन्नई ओपनमधून बाहेर, mahesh bhupathi out from chennai open

भूपती - नेस्टर चेन्नई ओपनमधून बाहेर...

भूपती - नेस्टर चेन्नई ओपनमधून बाहेर...
www.24taas.com, चेन्नई

भारतीय टेनिसपटू महेश भूपती आणि कॅनडाचा डेनियल नेस्टर यांची जोडी चेन्नई ओपन एटीपी टेनिस टूर्नामेंटमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे आता या टूर्नामेंटमधून ही जोडी बाहेर पडलीय.

भूपती आणि नेस्टर या जोडीला रुसच्या रावीन क्लासेन आणि अमेरिकेच्या निकोलस मोनरो या जोडीकडून क्वार्टर फायनल मॅचमध्ये ६-४, ७-५ असा पराभव स्वीकारावा लागलाय.

पुरस्काराचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भूपती आणि नेस्टर यांच्या जोडीला काल रात्री उशीरा झालेल्या या सामन्यात पराभव पत्करावा लागला. हा सामना ७५ मिनिट रंगला होता. पहिल्या सेटमध्ये सहजरित्या जिंकल्यानंतर क्लासेन आणि मोनरो यांची दुसऱ्या सेटमध्ये ०-३ अशी पिछेहाट झाली मात्र पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत त्यांनी हा सामना हस्तगत केला.

या अगोदर लिएंडर पेसलाही आपल्या जोडीदारासोबत पराभव पत्करून या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय. आता या वर्गात भारताच्या अपेक्षा आहेत त्या रोहन बोपन्नावर. बोपन्ना आणि राजीव राम यांची जोडी काही कमाल दाखवू शकेल, अशी आशा आता भारताला आहे.

First Published: Friday, January 4, 2013, 16:50


comments powered by Disqus