मॅंचेस्टर सिटी क्लब भरणार दंड manchester city should pay penalty

मॅंचेस्टर सिटी क्लब भरणार दंड

मॅंचेस्टर सिटी क्लब भरणार दंड
www.24taas.com, झी मीडिया, लंडन

युरोपीयन फुटबॉल क्लब मॅंचेस्टर सिटीला युरोपीय फुटबॉल महासंघाकडून पाच कोटी पौंडचा दंड आकारण्यात आला होता. हा दंड मॅंचेस्टर सिटी क्लबने मान्य केला आहे. त्याच प्रकारे चॅम्पियन्स लीगमध्ये आपली टीम 25 ऐवजी 21 खेळडूंनाच खेळवेल या गोष्टीला ही क्लबने दुजोरा दिला आहे.

युरोपीय फुटबॉल महासंघाच्या आर्थिक नियमावलीचा भंग केल्याचा आरोप ठेऊन मॅंचेस्टर सिटी क्लबवर पाच कोटी पौंडचा दंड ठोठावण्यात आला होता. फुटबॉल वर्ल्डकपनंतर सुरू होणाऱ्या युरोपीयन स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठीच मॅंचेस्टर सिटी क्लबने युरोपीय महासंघाने लावलेला हा दंड स्वीकारल्याचे बोलण्यात येत आहे.

मॅंचेस्टर सिटी क्लबचे मालक शेख मन्सूर बिन झायेद अल नाह्यन यांनी सांगितले की,`सि़टी क्लबने या वर्षीचे प्रीमियर लीग विजेतेपद जिंकले. पण मॅंचेस्टर सिटीने क्लबचे टॉप खेळाडू विकत घेताना अब्ज पौंड खर्च केले होते. या कारणाने आमच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईची रक्कम ही फारच मोठी आहे. पण आम्ही हा दंड मान्य करत आहोत. तसेच दंड लागल्याच्या कारणाने आता आम्हाला या वर्षी खेळाडूंच्या मानधनातही वाढ करता येणार नाही.`

सिटीने ज्याप्रमाणे नियमांची पायमल्ली केली. त्याचप्रमाणे पॅरिस सेंट जर्मन, झेनीत सेंट पीट्‌सबर्ग, रुबिन कझान, अँझी मॅखाचकाला, गॅलातासरी, ट्रब्‌झॉनस्पॉर, बुरसॅस्पर आणि लेवस्की सोफिया या संघांनी देखील नियम मोडले आहेत. या कारणानेच या क्लबला देखील युरोपीय फुटबॉल महासंघाने वेगवेगळ्या प्रकारचा दंड ठोठावला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 18:33


comments powered by Disqus