फुटबॉलपटू मॅराडोनाची फोटोग्राफरला किक, maradona gives kick to photographer

फुटबॉलपटू मॅराडोनाची फोटोग्राफरला किक

फुटबॉलपटू मॅराडोनाची फोटोग्राफरला किक
www.24taas.com,झी मीडिया, नवी दिल्ली

प्रसिद्ध फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना पुन्हा एकदा चर्चेत आलाय.एका मॅगझिन फोटोग्राफरला त्यानं किक मारलीय. ही किक मॅराडोनानं जाणूनबुजून मारल्याचा आरोप फोटोग्राफर एनरीक मेडिना यानं केलाय.

रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय..फोटोग्राफर एनरीक मेडिना हा मेराडोना याच्या वडिलांच्या घरासमोर १९८६च्या वर्ल्ड कप विजेत्याचे फोटो घेण्यासाठी थांबला होता. याआधी सुद्धा मॅराडोनानं प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीवर हल्ला केला होता.


१९९४ ला मॅराडोनानं त्याच्याकडील एअरगननं माध्यमांच्या प्रतिनिधीवर हल्ला केला होता.तर नुकत्याच दोन महिन्यापूर्वी विमानतळावर त्याचा पाठलाग करणा-या फोटोग्राफर्सवर त्यानं दगडफेक केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013, 17:45


comments powered by Disqus