मला माझा मृत्यू दिसलाय – टायसन, Mike Tyson Claims He Is `Close To Death`

मला माझा मृत्यू दिसलाय – टायसन

मला माझा मृत्यू दिसलाय – टायसन
www.24taas.com , झी मीडिया, लंडन

खलनायक ठरलेला माजी मुष्टियोद्धा माईक टायसन एका वेगळ्याच कारणाने त्रस्त आहे. त्यांने आपले मरण पाहिले आहे. मला माझा मृत्यू दिसत असल्याचे त्याने म्हटले आहे. हा मृत्यू दारू आणि अमली पदार्थामुळे जवळ आल्याचे त्यांने नमुद केले आहे.

मुष्टियोद्धा म्हणून माईक टायसन नाव प्रसिद्ध असले तरी अनेक कारणांने वादळी ठरले आहे. मी अजूनही दारू आणि अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे माईक टायसन याने केले आहे. मुष्टियोद्धा प्रचारक म्हणून पदार्पण करणार्याय माईक टायसनने एका पत्रकार परिषदेदरम्यान ही कबुली दिली.

टायसन म्हणाला, माझी लोकांमध्ये एक ‘वाईट माणूस’ अशी प्रतिमा आहे. यापूर्वी मी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत आणि त्यासाठी लोकांनी मला माफ करावे, असे मला वाटते. मला माझे आयुष्य वेगळ्या पद्धतीने शांततेने जगायचे आहे, असा पश्चातापही त्यांने व्यक्त केला.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 08:47


comments powered by Disqus