सानिया आणि नदाल झाले मुंबईकर Nadal, Sania and Sampras to represent Mumbai in ITPL

सानिया आणि नदाल झाले मुंबईकर

सानिया आणि नदाल झाले मुंबईकर

www.24taas.com, मी मीडिया, नवी दिल्ली

ग्रॅन्ड स्लॅम जिंकणारा पहिला भारताचा टेनिसपटू महेश भूपती याच्या संकल्पनेतून होणारी `आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग` (आयटीपीएल) स्पर्धेला लवकरच सुरुवात होणार आहे.

आंतरराष्ट्रीय टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेला २८ नोव्हेंबरपासून सुरुवात होतेय. दुबईमध्ये १४ डिसेंबर रोजी या स्पर्धेची सांगता होईल.

जगातील पहिल्या स्थानावर असलेला टेनिसपटू राफेल नदाल, भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या स्पर्धेत मुंबई संघातून खेळणार आहेत.

मात्र, टेनिसपटू सोमनाथ देववर्मन या स्पर्धेत खेळणार नाही. तसेच मुंबई संघात फ्रान्सचा गाएल मोनफिल्स, अमेरिकेचा पीट सॅम्प्रस, माजी अ‍ॅना इव्हानोव्हिक, फॅब्रिक सॅन्टोरो यांचा समावेश करण्यात आला आहे.

जगात दुसऱ्या स्थानावर असलेला नोव्हाक जोकोव्हिक दुबई संघाची प्रमुख म्हणून भूमिका बजावणार आहे.
तसेच दुबई संघात कॅरोलिन व्होझ्नियाकी, गोरान इव्हानसेव्हिक, जान्को टिपसारेव्हिक, नेनांद झिमोनिक, मॅलीक जझिरी आणि मार्टिना हिंगीस यांनीही आयटीपीएलमध्ये सहभाग घेतलाय.

बँकाकच्या संघात अँडी मरे, जो विल्फ्रेड त्सोंगा, व्हिक्टोरिया अझारेंका, डॅनियल नेस्टर, कार्लोस मोचा आणि कर्स्टन फ्लिपकेन्स स्थान दिलंय. सेरेना विल्यम्स, आंद्रे आगासी, टॉमस बर्डीच, लेटॉन हेविट, ब्रुना सोआरीस, पॅट्रिक राफ्टर, डॅनीला हॅन्टुचोव्हा आणि निक क्रिगियोस सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

तसेच स्पर्धेत मुंबई, सिंगापूर, दुबई आणि बँकॉक या चार संघांचा यात समावेश आहे. या स्पर्धेसंदर्भात रविवारी बैठक झाली. या बैठकीत स्पर्धेचा काही काळापुरतीचा कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 17:54


comments powered by Disqus