Last Updated: Thursday, August 16, 2012, 13:19
www.24taas.com, माद्रिदस्पेनचा स्टार टेनिसपटू राफाएल यंदा अमेरिकन ओपनमध्ये सहभागी होणार नाही. नादाल च्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो यावेळी अमेरिकन ओपनमध्ये टेनिस खेळू शकणार नाही.
जागतीक क्रमवारीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नादालचा जूनमध्ये विम्बल्डनमध्ये पराभव झाला होता. तेव्हापासून अद्याप त्याने कुठल्याही स्पर्धेत टेनिस खेळलेलं नाही. याच दुखापतीमुळे त्याला लंडन ऑलिम्पिकपासूनही दूर राहावं लागलं होतं. लंडन ऑलिम्पिकमध्ये नादाल स्पेनचा ध्वजवाहक बनला असता, मात्र दुखापतीमे त्याने ही संधी गमावली.
नादालने या गोष्टीची घोषणा ट्विटरवर केली आहे, “मी अमेरिकन ओपन नाही खेळू शकत. मला याबद्दल खूप दुःख होतंय. माझ्या सर्व चाहत्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद”
First Published: Thursday, August 16, 2012, 13:19