दीपिकाला गोल्ड मेडलने दिली हुलकावणी, No gold for deepika

दीपिकाला गोल्ड मेडलने दिली हुलकावणी

दीपिकाला गोल्ड मेडलने दिली हुलकावणी
www.24taas.com, झी मीडिया,

भारताची तिरंदाज दीपिका कुमारीला वर्ल्ड कपमध्ये गोल्डनं पुन्हा हुलकावणी दिली. तिला सलग तिस-यांदा सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागले.

19 वर्षिय दीपिकाची सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या तीन प्रयत्नात तिने प्रत्येकी दहा पॉईंट्स मिळविले होते. त्यामुळे 3-1 अशी आघाडी तिने घेतली होती. मात्र, नंतर दुस-या सेटमध्ये तिला 9, 9 आणि 10 असे पॉईंट्स मिळाले. तिस-या सेटमध्ये तिला 10, 9 पॉईंट्स मिळाले.

आत्मविश्वास गमावल्यामुळे दीपिकाचे बाण योग्य दिशेने जात नव्हते. अखेर चौथ्या सेटमध्येही तिला २८ गुणांवरच समाधान मानावे लागले. त्यामुळे यून हिने ५-३ अशी आघाडी घेतली. दीपिकाला पहिल्यावहिल्या जागतिक सुवर्णपदकापासून रोखण्यासाठी तिला बरोबरीत रोखणे आवश्यक होते. मात्र तिला ते शक्य झालं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 23, 2013, 23:34


comments powered by Disqus