चॅम्पियन जोकोविच `ऑस्ट्रेलियन ओपन`मधून बाहेर

चॅम्पियन जोकोविच `ऑस्ट्रेलियन ओपन`मधून बाहेर

चॅम्पियन जोकोविच `ऑस्ट्रेलियन ओपन`मधून बाहेर
www.24taas.com, झी मीडिया

ऑस्ट्रेलियन ओपनचा तीन वेळेस चॅम्पियन असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच पराभूत झालाय. जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडलाय.

क्वार्टर फायनलमध्ये जोकोविच आणि स्वित्झर्लंडच्या स्टॅनिसलास वावरिन्कामध्ये पाच सेटचा रोमांचक सामना झाला. या सामन्यात जोकोविचचा 2-6, 6-4, 6-2, 3-6 आणि 9-7 असा पराभव झाला.

वावरिकन्काला या आधी जोकोविचकडून १४ वेळेस हार पत्करावी लागली होती. मात्र ऑस्ट्रेलियन क्वार्टर फायनलचा सामना त्याच्यासाठी लकी ठरलाय. चार तास चाललेल्या या सामन्यात त्याने जोकोविचला हरवलं, सेमा फायनलचा सामना वावरिन्का आणि टॉमस बर्डिचमध्ये होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 21, 2014, 19:34


comments powered by Disqus