फुटबॉल वर्ल्डकपमध्ये यंदा ‘ऑक्टोपस’च्या जागा चीनी ‘पांडा’! Panda cubs to predict 2014 World Cup win

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये यंदा ‘ऑक्टोपस’च्या जागा चीनी ‘पांडा’!

फुटबॉल वर्ल्डकपमध्ये यंदा ‘ऑक्टोपस’च्या जागा चीनी ‘पांडा’!
www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंग

दक्षिण आफ्रिकेतील (२०१० साली) गत फुटबॉल वर्ल्डकपमध्ये पॉल ऑक्टोपसनं अचूक भविष्यवाणी करून अवघ्या क्रीडाविश्वाकचे लक्ष वेधून घेतलं होतं. यंदा चीनमधील पांडा ब्राझीलमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमधील सामन्यांची भविष्यवाणी करणार आहे.

जर्मनीच्या पॉल ऑक्टोपसनं २०१०च्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीचा संघ तीन साखळी लढतींपैकी दोन लढती जिंकेल अशी भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे, त्याचे हे तिन्ही अंदाज अचून निघाल्यानं पॉल ऑक्टोपस कमालीचा लोकप्रिय झाला होता. त्यानंतर जर्मनी उपांत्यपूर्व लढतीत इंग्लंडवर तर उपांत्य लढतीत अर्जेंटिनावर विजय मिळवेल असं भाकीत पॉल ऑक्टोपसनं केलं होतं. त्याचं हे भाकीतही तंतोतंत खरं ठरलं. त्यानंतर स्पेन जगज्जेता होईल, असा शेवटचा अंदाज या पॉल ऑक्टोपसनं वर्तविला होता. स्पेन विजेता ठरल्यानंतर या पॉल ऑक्टोपसची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चीनही सामन्यांचे अंदाज वर्तविण्यासाठी पांडा या प्राण्याच्या पिल्लांचा वापर करणार आहे. चीनमध्ये जवळपास १६०० पांडा आहेत. सामन्यांचे अचूक अंदाज सांगण्यासाठी चीन एक आणि दोन वर्षांच्या पांडाचा वापर करणार आहे.

साखळी लढतींसाठी पांडाच्या समोर वेगवेगळ्या तीन बांबूच्या बास्केट ठेवण्यात येतील. ज्या बास्केटमधील अन्न पांडा उचलेल त्यावरून संघ जिंकणार, हरणार की लढत बरोबरीत सुटणार याबाबत अंदाज वर्तविला जाईल. बाद फेरीचा अचूक अंदाज सांगण्यासाठी झाडांना संबंधित संघांच्या देशाचे ध्वज लावले जातील. पांडा ज्या झाडावर चढेल तो संघ विजयी होईल, अशी भविष्यवाणीची पद्धत असणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 7, 2014, 13:41


comments powered by Disqus