राफाएल नदाल नंबर वन,Rafael Nadal number one

राफाएल नदाल नंबर वन

राफाएल नदाल नंबर वन
www.24taas.com, पीटीआय, नवी दिल्ली

बारा ग्रँडस्लॅम आणि बीजिंग ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता राफाएल नदालने सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचला मागे टाकत जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान मिळविलंय. टेनिस जगतात क्ले कोर्टचा शेहनशाह संबोधला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफाएल नदाल जागतिक टेनिस रँकिंगमध्ये पुन्हा एकदा नंबर वनवर विराजमान झालाय.

जुलै २०११ नंतर तब्बल दोन वर्षांनंतर नदालला हे अव्वल स्थान मिळाले आहे. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला दुसऱ्या क्रमांकावर ढकललं होतं.

चीन ओपन टेनिसच्या सेमीफायनलमध्ये थॉमस बर्डीने दुखापतीच्या कारणामुळे माघार घेतली आणि नदालचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. या आघाडीमुळे नदालच्या गुणांमध्ये वाढ होऊन त्याने पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली.

First Published: Saturday, October 5, 2013, 18:31


comments powered by Disqus